`मी अमित ठाकरेंचाच प्रचार करणार`, भाजपच्या `या` नेत्याने मांडली जाहीर भूमिका
BJP leader Amit Thackeray Campaign: माहीममधील अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय.
BJP leader Amit Thackeray Campaign: माहीममधील अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या सरवणकरांनी उमेदवारी मागं घेतली नाही तर भाजप नेते अमित ठाकरेंचा प्रचार करतील अशी भूमिका भाजपनं घेतलीय. प्रसाद लाड यांनी याबाबत भाजपची भूमिका मांडलीये. माहीममध्ये महायुतीचा उमेदवार आहे तरीही भाजप मनसेचा प्रचार करणार असल्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
माहिम विधानसभेची निवडणूक अटी-तटीची ठरणार आहे. लोकसभेत राज ठाकरेंच्या मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळं राज्यात एकच चर्चा आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड महायुती करणार अशी चर्चा होती. मात्र सदा सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याने महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड?
तुझा प्रचार मी करणार असल्याचे मी अमितला सांगितलंय. फडणवीस, शेलार यांनीदेखील यासंदर्भात सांगितले आहे. त्यामुळे यात लपवण्यासारखे काही नाही. या जिल्ह्याचा मी निरीक्षक आहे. अमित ठाकरेंचा प्रचार आम्ही खुलेपणाने करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.
शिवसेनेची भूमिका काय?
महायुतीतील सर्वोच्च नेत्याने असे सांगितले असेल तर ठिक आहे. पण याचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि पवार घेत असतात. महायुतीत जे ठरलंय त्याप्रमाणे तुम्हाला प्रचार करावा लागेल. अन्यथा महायुतीत तेढ निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी दिली आहे.
निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार
आम्हाला विश्वासात न घेता मनसेकडून माहीमचा उमेदवार जाहीर करण्यात आला, असं शिंदेंनी म्हटलं आहे. आमची राज ठाकरेंसोबत विधानसभेच्या जागांबाबत बोलणी सुरू होती. असं असतांना त्यांनी उमेदवार जाहीर केलाय. माहीममध्ये आमचा विद्यमान आमदार आहे. कार्यकर्त्यांची माहीममधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ नये यासाठीही नेत्याला प्रयत्न करावे लागतात, असं शिंदेंनी म्हटलं आहे. त्यामुळं आता माहिमचा तिढा कसा सुटणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
माहिम येथे सलग दोन ते तीन टर्म शिवसेनेचा आमदार आहे. त्यांचे कार्यकर्तेदेखील निवडणूक लढण्यास उत्सूक आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल तुटू न देणे हेदेखील नेत्याचे काम आहे. आता आमची महायुती आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार आम्ही एकत्र आहोत. आम्ही महायुतीकडून निवडणुक लढवणार आहोत. रामदास आठवलेंचा पक्ष आणि जन सुराज्य पक्षदेखील आमच्यासोबत आहे. बहुमत आम्हाला मिळेल, असंही शिंदे म्हणाले आहेत.
काहीही झालं तरीही निवडणूक लढणार- सरवणकर
काहीही झालं तरीही निवडणूक लढणार असल्याचं पुन्हा एकदा सरवणकर यांनी स्पष्टच सांगितलंय.. कुणीही सांगितलं तरीही आता माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय... तसेच महायुतीचा उमेदवार म्हणून एबी फॉर्म भरल्याचंही सरवणकर म्हणालेत.. येवढचं नाही तर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय.एकीकडे मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंनी माहीम मतदारसंघात प्रचार सुरू केलाय.. घरोघरी जाऊन अमित ठाकरे प्रचार करताहेत.. माहीमचं मैदान आपणच मारणार असल्याचा विश्वास यावेळी अमित ठाकरेंनी व्यक्त केलाय.. तर दुसरीकडे ज्यांचा एकही आमदार नाही ते सत्तेची स्वप्न पाहत असल्याचं सांगत सदा सरवणकर यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना डिवचलंय.महायुतीचा पाठिंबा अमित ठाकरेंना मिळावा यासाठी भाजप आणि शिंदेंकडून प्रयत्न करण्यात येताहेत.. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये...ज्यांना वाटतं जागा सोडावी त्यांनी त्यांचे मतदारसंघ मनसेसाठी द्यावेत असा टोला सरवणकरांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत हे आमनेसामने आहेत.