निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार

Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 31, 2024, 04:48 PM IST
निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार
अमित ठाकरे

Amit Thackeray: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. माहिम मतदार संघातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पण एका कृतीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अमित ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते. दरम्यान अमित ठाकरेंविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,सचिव अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगमजी यांची भेट घेतली आणि यासंदर्भात तक्रार दाखल केली. 

छत्रपती शिवाजी महाराज पार्क,दादर येथे दिपोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला. याला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे परवानगी देण्यात आली. ही देण्यात आलेली परवानगी नियमबाह्य असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

तसेच या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिले होते. त्यामुळे या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More