Devendra Fadnavis Net Worth: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला घवघवीत यश मिळवून देत, पुन्हा एका सत्तेत आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे 5.2 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये 56 लाखांची जंगम आणि 4.6 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यात शेतजमीन आणि निवासी संपत्ती आहे. दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी 7.9 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये 6.9 कोटी जंगम आणि 95 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एकूण 13 कोटींची संपत्ती आहे. 


38 लाखांचं वार्षिक उत्पन्न


ताज्या तपशीलानुसार, फडणवीस यांनी 2023-24 आर्थिक वर्षात 38.7 लाख आणि 2022-23 आर्थिक वर्षात 38.6 लाख वार्षिक उत्पन्न घोषित केले होतं.



फडणवीस यांच्याकडे  23 हजार 500 रुपये रोख रक्कम आहे, तर 2.3 लाख इतकी रक्कम बँकांमध्ये जमा आहे. फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 1.7 लाख ची PPF रक्कम आणि 3 लाख किमतीची ICICI PRU Life Time Classic पॉलिसी देखील जाहीर केली आहे. तसंच फडणवीस यांच्याकडे एकूण 32 लाखांचं सोनं आहे. 


विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वत:च्या मालकीची एकही गाडी नाही. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडेही गाडी नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. 


फडणवीस यांची नागपुरात दोन भूखंडांवर घरे आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार एकाची किंमत 3.5 कोटी आणि दुसऱ्याची किंमत 47 लाख आहे.


अमृता फडणवीस यांची 7.9 कोटींची संपत्ती


2023-24 मध्ये अमृता फडणवीसांचं वार्षिक उत्पन्न 79 लाख 30 हजार 402 रुपये होतं. 2022-23 मध्ये वार्षिक उत्पन्न 92 लाख 48 हजार 95 रुपये होते. 2020-21 मध्ये हा आकडा 1 कोटी 84 लाख 38 हजार 355 होतं. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 10 हजार रोख रक्कम आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये 5.6 कोटींची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे 65 लाखांचे दागिने आहेत, तसंच एकही कार नाही. 


2019 च्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना फडणवीस यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 3.86 कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली होती.