Maharashtra Government Formation: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना आणि बैठकीच्या सत्रांना  वेग आला खरा. पण, कुठंही तोडगा निघत नसल्याचच पाहायला मिळालं. मागील काही दिवसांपासून राज्यातील मोठ्या नेत्यांची सातत्यानं सुरू असणारी दिल्लीवारीसुद्धा इथं चर्चेचा विषय ठरली. त्यातच नुकतंच अजित पवारांनीही दिल्ली गाठल्याचं म्हटलं गेलं. पण, तिथं नेमकं काय घडलं? सूत्रांच्या माहितीनुसार अमित शाह यांची भेट घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री दिल्लीदरबारी पोहोचले. यावेळी तिथं नेमकं काय घडलं याचा खुलासा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. 


अजित पवार दिल्लीमध्येच... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तटकरेंनी अजित पवार दिल्लीमध्येच असल्याच्या चर्चांना दुजोरा देत मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. ते दिवसभर दिल्लीमध्येच असतील. सध्या ते काही खासगी कामांसाठी इथं असून, आपली सायंकाळी त्यांच्यासोबत भेट घडू शकते असंही ते म्हणाले. अमित शाह दिल्लीबाहेर असताना ते दिल्लीत येईपर्यंत अजित पवारांचा मुक्काम दिल्लीत असेल का? असा प्रश्न केला असता ते फक्त शाहंच्या भेटीसाठीच दिल्लीत आले होते असं नाही, हे तटकरेंनी स्पष्ट केलं. 


शक्य असल्यास अमित शाह आणि अजित पवारांची भेट होऊ शकते. 5 डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरु शकते अशा चर्चा असल्या तरीही सध्या मात्र आपल्या पक्षात संघटनेला बळकटी देणयासाठीच्याच चर्चा सुरू असल्याचं तटकरे म्हणाले. अजित पवारांची भेट शाहांनी नाकरली असं काहीच झालं नसून, खुद्द अजित पवारांनीच त्यांची वेळ घेतली नव्हती त्यामुळं इथं संवादाचा अभाव नसल्याचा प्रश्नच नाही असंही त्यांनी थेट सांगितलं. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Assembly Election : राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी केलं हे गुपित उघड?


 


दरम्यान, अजित पवारांच्या पक्षाकडून राज्य मंत्रिमंडळात जास्त जागांची मागणी करण्यात येणार असून, अजित पवार राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि राज्यात जास्तीत जास्त मंत्रीपदं देण्याची मागणी करावी असाही सूर केंद्रीय नेतृत्त्वापुढं आळवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंदिगढ दौऱ्यावर असल्यामुळं मंगळवारी संध्याकाळी यासंदर्भातील चर्चा आणि भेट होण्याची शक्यता होण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.