Girish Mahajan Meet Eknath Shinde : महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्र्यांचं नाव गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे खातेवाटपासंदर्भातही कुठलीही माहिती समोर आलेली नाही. अशात अचानक सोमवारी (2 डिसेंबरला) भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीष महाजन ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर चर्चांना एकच उधाण आलं. 


भेटीनंतर गिरीष महाजनांनी दिली मोठी अपडेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीत काहीही आलबेल नाही अशी चर्चा रंगली असताना अचानक भाजपने संकटमचक शिंदेंच्या भेटीला जाणे, यामुळे महायुतीत खातेवाटपावरून काही मतभेद तर नाही, अशी शंका जोर धरु लागली. मात्र ठाण्यातल शुभदीप निवासस्थानी सव्वा तास चर्चा झाल्यानंतर महाजन पत्रकारांशी बोलले तेव्हा त्यांनी महायुतीत सर्व काही आलबेल असून कुठलेही मतभेद नाहीत, असं स्पष्ट केलं. गेल्या चार पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. त्यांना मी यापूर्वीच भेटीची वेळ मागितली होती. पण ते दरे गावी गेल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. 


महाजन पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद देऊन सांगितलं होतं, आम्ही नाराज नसून महायुतीत सगळं ठिक आहे. मग मी वेगळं काही सांगायची गरज नाही. एकनाथ शिंदे यांचं मन याबाबत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. 5 तारखेची आमची तयारी सुरु आहे. मला असं वाटतं उद्या त्यांची तब्येत बरी होईल आणि त्यानंतर ते स्वत: बैठकी घेणार आहेत. 


खातेवाटपाबद्दल आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. खातेवाटपाबद्दल महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल. कोण खातं कोणाला पाहिजे याबद्दल चर्चा झाली नसून मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी आलो होतो. काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने ते उद्या 6 डिसेंबरच्या तयारीसाठी बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत उद्या बरी होईल असं मी म्हटलंय. आम्ही सगळे एकत्र आहोत, उद्यापासून एकनाथ शिंदे लिड घेतली. महायुतीत कुठेही मतभेद नाही. आम्ही प्रामाणिकपणे महायुतीत एकत्र आहोत. 5 तारखेला आमचा शपथविधी होणार आहे, आम्ही हे सगळं एकत्रित करणार आहोत. 5 तारखेला शपथविधी हा अतिशय दिमाखदार होणार आहे, असंही महाजन यांनी सांगितलं.