राज ठाकरेंनी उमेदवार म्हणून लढवलेली `ही` निवडणूक! स्वत: खुलासा करत म्हणाले, `माझ्या आयुष्यात...`
Raj Thackeray Once Faught Election: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांच्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वत: एक निवडणूक लढवी होती. यासंदर्भात त्यांनीच खुलासा केला आहे. नेमकं ते कुठे निवडणूक लढले होते आणि त्यात काय झालेलं जाणून घ्या...
Raj Thackeray Once Faught Election: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना, पक्षांतराला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना वेग आलेला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच अनेक मतदारसंघांमध्ये नेमका उमेदवार कोण असणार याबद्दलचा संभ्रम कायम आहे. यामध्ये काही हायप्रोफाइल मतदारसंघाचाही समावेश आहे. माहीम मतदारसंघ अशाच एक मतदारसंघांपैकी एक आहे. येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खरं तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अमित ठाकरे हे त्यांच्या ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये वरळीमधून निवडणूक लढली आहे. यंदाही आदित्य ठाकरे त्याच मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. मात्र तुमच्यापैकी फार कमी लोकांना ठाऊक असेल की आदित्य ठाकरेही खरं तर निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे नाहीत. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याच्या काही दशकं आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक लढवली होती. याबद्दलचा खुलासा राज यांनीच केला आहे.
कधी आणि कुठे केला खुलासा?
एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना जोर आलेला असतानाच काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी प्रसिद्ध फूड ब्लॉगर कुणाल विजयकर यांना एक विशेष मुलाखत दिली. मात्र ही मुलाखत राजकीय नाही तर राज ठाकरेंमधील खवय्या कसा आहे, त्यांच्या आवडी-निवडी काय आहेत यासंदर्भातील होती. याच मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अगदी कॉलेज आणि शालेय जीवनातील आठवणींपासून ते आजपर्यंतचे यापूर्वी कधीही न सांगितलेले किस्से सांगितले. सदर मुलाखतीसाठी राज ठाकरे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहीत हजर होते. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि कुणाल विजयकर हे कॉलेजमधील मित्र असल्याचा खुलासा कुणाल यांनीच मुलाखतीच्या सुरुवातीला केला. त्यानंतर 'राज ठाकरे साहेब'ऐवजी तू मला तुम्ही जे कॉलेजला हाक मारायचे तशी 'राजा'च हाक मार, असं राज यांनी कुणाल यांना सांगितलं.
नक्की वाचा >> शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...
कोणाविरुद्ध लढवली राज ठाकरेंनी निवडणूक?
कुणाल आणि राज यांच्या गप्पा सुरु झाल्यानंतर राज यांनी एक जुनी आठवण सांगताना आपण आयुष्यात एकाच निवडणूक लढलो होतो असं त्यांच्यासोबत मुलाखतीत सहभागी होण्यासाठी आलेले मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांना सांगितलं. "माझ्या आयुष्यात मी कधीही निवडणूक लढवलेली नाही. एकदाच लढवली होती ती कॉलेजमध्ये. क्लास रिप्रेझेंटेटीव्हसाठी. आमचे दोन वर्ग असायचे स्कूल ऑफ आर्ट्सला. दोन जे एकमेकांसमोर उमेदवार होते तर ते हा आणि मी होतो," असं राज यांनी सांगताच कुणाल यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर कुणाल यांनी, "म्हणजे याने (राज ठाकरेंनी) जी एकमेव निवडणूक लढवली ती काँग्रेसच्या विरुद्ध नाही भाजपाच्या विरुद्ध नाही तर माझ्याविरुद्ध! पण तो जिंकला," असं म्हटलं.
नक्की वाचा >> फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'
(फोटो सौजन्य - youtube/KhaaneMeinKyaHai वरुन साभार)
नक्की वाचा >> राज ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का! प्रत्यक्ष निवडणुकीआधीच...
नेमकं या निवडणुकीत व्हायचं काय?
यानंतर राज ठाकरेंनी या निवडणुकींनंतर काय व्हायचं ते ही सांगितलं. "मात्र आमच्याकडे कसं होतं की, जिंकू कोणी देत हरु कोणी देत त्यानंतरची पार्टी एकत्र व्हायची. त्यामुळे या निवडणुकीला फारसा काही अर्थ नसायचा. कारण हरलेले जिंकलेले सगळेच साडेतीननंतर सांडलेले असायचे," असं म्हणताच कुणाल विजयकर यांनी हसत यावरही होकार दर्शवला.