Maharashtra Assembly Election: राज्यातील `या` मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे.
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मैत्रीच्या आणाभाका घेणारे राजकीय पक्ष आपल्याच दोस्तांशी अनेक मतदारसंघात कुस्ती खेळतायेत असं चित्र निर्माण झालं आहे. मैत्रीपूर्ण लढती होणारच नाहीत असा दावा करणारे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकमेकांशी भिडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती लागल्याचं समोर आलं आहे.
दोस्तीत कुस्ती होणारे मतदारसंघ कोणते?
1) मानखुर्द-शिवाजीनगर
मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिक उमेदवार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेनं सुरेश पाटील यांना उमेदवारी दिलीय.
2) अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरुद्ध शिवसेनेचे अविनाश राणे मैदानात आहेत
3) देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीनं सरोज अहिरे उमेदवार आहेत. शिवसेनेनं राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4) मोर्शीत भाजपचे चंदू यावलकर आणि राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार लढणार आहेत.
5) आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्यात लढत होणार आहे
6) पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय शिवतारेविरोधात अजित पवारांनी संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली आहे.
7) सांगोल्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचे दीपक साळुंखे आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे.
8) नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात भाजपच्या तुषार राठोड यांच्याविरोधात बालाजी खतगावकर हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
यापूर्वी दोस्तीत कुस्ती होणारच नाही असं नेते म्हणाले होते. पण महायुती आणि आघाडीला एकमेकांसोबत लढत असतानाच आपापसातही लढावं लागत आहे. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढती कुणाच्या फायद्याच्या ठरणार आणि कुणाचं नुकसान करणार? यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.