Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) बारामतीमधून (Baramati) युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. बारामतीतून अजित पवारांसह युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बारामतीत काका विरुद्ध पुतण्या सामना रंगणार असल्याने संपूर्ण राज्याचं या लढतीकडे लक्ष असेल. दरम्यान अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) भावूक झाले. आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीतून अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आता कोण चुकलं? पहिला फॉर्म मी भरणार होतो असं म्हणत अजित पवारांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. आई नाही म्हणत असताना घरात एकोपा राहिला पाहिजे, आमचं घर कुणी फोडलं? असा भावनिक सवालही अजित पवारांनी यावेळी बारामतीकरांना केला...


"माझी मागे चूक झाली, पण आता कोणी चूक केली. पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांचं कुटुंब. आमची बिकट परिस्थिती होती. आम्ही ती चांगली केली, आईने आधार दिला. आई सांगतीये, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरु नका. या पद्धतीन जे काही चाललं आहे ते बरोबर नाही. मोठ्या व्यक्तींनी यात मध्यस्थी करत बोलायला हवं होतं," असं अजित पवार म्हणाले.  


पुढे त्यांनी सांगितलं की, "फॉर्म कोणी भरायला सांगितला विचारलं तर म्हणतात साहेबांनी सांगितलं. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घऱ फोडलं का? आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही". 


"आज मला तुम्हा सर्वांना सागंयच आहे की, आपल्याला आपला विकास करुन घ्यायचा आहे. घरातील भांडणं चार भिंतीच्या आत झाली पाहिजेत. चव्हाट्यावर आणण्याचं कारण नाही. दरी पडली तर ती साधायला दुसरं कोणी येऊ शकत नाही," असंही अजित पवार म्हणाले.