व्होट जिहादला शरद पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांच्या `त्या` व्हिडीओवर अखेर सोडलं मौन
विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादच्या मुद्यासोबतच भाजपनं कटेगें तो,बटेगें ,एक है तो,सैफ चाही मुद्दा लावून धरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी व्होट जिहादवरून हल्ला चढवला याला शरद पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात.
विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादच्या मुद्यासोबतच भाजपनं कटेगें तो,बटेगें ,एक है तो,सैफ चाही मुद्दा लावून धरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी व्होट जिहादवरून हल्ला चढवला याला शरद पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात.
लोकसभा निवडणुकीतील निकालाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा जोर देऊन मांडला. फडणवीसांनी मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवत महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आऱोप केलाय. आता फडणवीसांच्या आरोपांना खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी बटेंगे तो कटेंगेचा विचार मांडणं देशासाठी घातक असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांनी थेट फडणवीसांवर व्होट जिहादवरून पलटवार केल्यानंतर आता त्याला आशिष शेलारांनीही उत्तर दिलं आहे. नोमानी कुणाचा प्रचार करतायेत हे सर्वांन माहित असल्याचं शेलार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात 11 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. विशेष म्हणजे 38 मतदारसंघात 20 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार आहेत. 120 जागा अशा आहेत जिथं मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठऱणार आहे.
त्यामुळे व्होट जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीसांनी प्रचारात आणल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. एकूणच काय विधानसभेच्या प्रचारात व्होट जिहाद विरुद्ध व्होट धर्मयुद्ध असा सामना रंगल्याचं दिसतंय... त्याचा फायदा कुणाला होणार हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होईल.