Maharashtra Assembly Elections 2024 :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पडतोय. एका हॉटेलमध्ये तब्बल 2 कोटींचं घबाड सापडलंय. पैशांचं हे घबाड कुणाचं आहे आणि ते कशासाठी आणण्यात आलं होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पैशांचं हे घबाड आयोगाच्या हाती कसं लागले ते जाणून घेऊया. 


हे देखील वाचा.... महाराष्ट्रातील 2 शहरं भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत; पहिले नाही तर दुसरे नाव ऐकून शॉक व्हाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 1 कोटीं 98 लाख  रुपये नाशिकमधील एका हॉटेलमध्ये सापडलेत. पाचशे रुपयांच्या नोटींची ही बंडल कुणाची आहे याचा तपास  सुरू आहे. मात्र निवडणुकीसाठीच ही रक्कम आणल्याची माहिती आहे. नाशिकमधील या हॉटलेमध्ये कोट्यवधी रुपये येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली होती. त्यानुसार आयोगाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक  हॉटेलमध्ये शिरले. टीप मिळाल्यानुसार हॉटेलमधील या खोलीत अधिकारी दाखल झालेत. त्यांनी तपास केल्यानंतर त्यांना ह्या बॅग मिळाल्यात. या बॅगमधील नोटांची बंडल पाहून अधिकारीही चक्रावलेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी हे पैसे कुणाचे आहे आणि कशासाठी आणले होते याचा तपास आता करताहेत. राजकीय धागेदोऱ्यांचा आयोग आणि पोलिस शोध घेताहेत.


हॉटेलमध्ये सापडलेली ही रक्कम शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदानंद नवले यांच्या गाडीत सापडल्याची चर्चा होती..मात्र त्यांनी याबाबत खुलासा केलाय.. पैशांचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचं नवले यांनी स्पष्ट केलंय. मतदानासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहे.. त्या पार्श्वभूमीवर पैशांचा पाऊस पडतांना दिसतोय.. काही कोटींची रक्कम सापडली पण गुप्त मार्गानं अनेक ठिकाणी पोहोचलेल्या कोट्यवधी रुपयांचं काय असा सवाल आता विचारला जातोय.