Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. तर, आरोप प्रत्यारोप, खुलासे आणि खळबळजनक दावे यांचा सिलसिला सुरु आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लानचा खुलासा करण्यात झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडले जाणार होते अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. 


हे देखील वाचा...  महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेत बंड करून 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं. या घटनेच्या बरोबर एका वर्षानंतर म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडात एका वर्षांचं अंतर होतं. मात्र शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन झालेला होता. गुवाहाटी व्हाया सुरत असा प्रवास एकनाथ शिंदेंसोबतच अजितदादाही करणार होते...मात्र काही अडचण आली आणि अजितदादांना वर्षभर वाट पाहावी लागली. या सगळ्या गोष्टींचा खुलासा दस्तुरखुद्द अजितदादांनीच केलाय. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच आमचीसुद्धा तयारी झाली होती असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय.


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल स्पॉट! कमी बजेटमध्ये बेस्ट ट्रीप, बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला देतात टक्कर 


2019 ते 2024...महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात जास्त उलथापालथीची 5 वर्ष. अभूतपूर्व राजकीय घटनांनी अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या दोन्ही महत्त्वाच्या पक्षाची शकलं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांनी वेगळी चूल मांडली. काही आमदारांसोबत जाऊन महायुतीत सहभागी झाले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपयशाचा सामना करावा लागला. आता विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी कसोटीची आहे.अस्तित्वाच्या लढाईत अजित पवार बाजी मारणार का, हे निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे.


महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शिवसेनेच्या बंडानं सुरु झाल्याचं वाटत असलं तर महाविकास आघाडीतील दोन पक्ष फोडण्याची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहल्याचं अजित पवारांच्या वक्तव्यानं अधोरेखित झालंय.