महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होताच शिंगे गटाला मोठी लॉटरी लागली आहे. तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
भंडारा विधानसभा मतदार संघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी 2019 च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली. शिवसेना फुटी नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री यांच्या जवळचे समजले जाणारे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मतदार संघात अनेक विकास कामे खेचून आणली. त्यांच्या या विकास कामांना पाहता दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, आज पवनी तालुक्यांतील 1111 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नवी मुंबईतील शिवसैनिकांनी घराणे शाही विरोधात थोपटले दंड
नवी मुंबई मधील शिंदे गट शिवसैनिकांनी नवी मुंबई घराणेशाही विरोधात दंड थोपटले आहेत. एकाच घरात दोन तिकीट दिल्यास शिवसैनीक काम करणार नसल्याची ठराव आज शिवसेनीकांनी केला आहे. नवी मुंबई शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले आहेत. ऐरोलीची जागा शिवसेनेला मिळावी असा पहिला ठराव. तर, दोन्ही तिकीट एकाच घरात गेल्यास शिवसैनिक कामं करणार नाही हा दुसरा ठराव मजूर करण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबई महायुती मधील राजकारण तापलं आहे.