Maharashtra Assembly Elections 2024 :  पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात भाजप नेते जगदीश मुळीक हे उमेदवारी अर्ज न भरताच परत फिरले . मुळीक अर्ज भरताना एक फोन आला होता. हा फोन देवेंद्र फडणवीस यांचा होता .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडगाव शेरीचे भाजप नेते जगदीश मुळीक यांनी अर्ज दाखल न करताच माघारी फिरल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अर्ज भरण्याची घोषणा देऊ लागले. भाजप नेते जगदिश मुळीकांचा उमेदवारी माघारीचा ड्रामा पाहायला मिळाला. 



वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे आणि भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र,जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि सनील टिंगरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली.टिंगरे यांना उमेदवारी मिळाल्यानं नाराज मुळीक निवडणूक लढवण्यावर ठाम होते. या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढण्याची जवळपास शक्यता होती. शेवटच्या दिवशी AB  फॉर्म घेऊन मुळीक निवडणूक केंद्रावर दाखल देखील झाले.  त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला.


देवाभाऊंचा फोन आल्यानंतर मुळीक फॉर्म न भरताच माघारी फिरले आणि या सर्व नाट्यावर पडदा पडला.लोकसभा निवडणुकीतही जगदीश मुळीक यांना निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ आली होती. आता विधानसभेतही त्यांना पुन्हा माघार घ्यावी लागलीय. मात्र, जगदीश मुळीक यांना  AB फॉर्म  देऊन माघार का घ्यायला लावली? महायुतीचा धर्म पाळायचा होता तर मुळीक यांना AB फॉर्म देण्यामागे भाजपचे दबावतंत्र होतं का असे अनेक प्रश्न उपस्थित होतायेत. 


पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. टिंगरे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. मात्र या रॅलीकडे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं निदर्शनास आलं.