Maharashtra Assembly Elections 2024 :  सदा सरवणकर माहीम विधानसभेतून माघार घेण्यास तयार नाहीये... काहीही झालं तरीही निवडणूल लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावाही त्यांनी केलाय.. येवढचं नाही तर त्यांनी ठाकरेंनाही डिवचलंय.. त्यामुळे माहीमचा राजकीय सामना आणखी रंगणार असल्याचं दिसतंय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहीम मतदारसंघात सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यात सामना रंगणार हे जवळपास निश्चित झालंय.. कारण काहीही झालं तरीही निवडणूक लढणार असल्याचं पुन्हा एकदा सरवणकर यांनी स्पष्टच सांगितलंय.. कुणीही सांगितलं तरीही आता माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय... तसेच महायुतीचा उमेदवार म्हणून एबी फॉर्म भरल्याचंही सरवणकर म्हणालेत.. येवढचं नाही तर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय


एकीकडे मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंनी माहीम मतदारसंघात प्रचार सुरू केलाय.. घरोघरी जाऊन अमित ठाकरे प्रचार करताहेत.. माहीमचं मैदान आपणच मारणार असल्याचा विश्वास यावेळी अमित ठाकरेंनी व्यक्त केलाय.. तर दुसरीकडे ज्यांचा एकही आमदार नाही ते सत्तेची स्वप्न पाहत असल्याचं सांगत सदा सरवणकर यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना डिवचलंय..  


महायुतीचा पाठिंबा अमित ठाकरेंना मिळावा यासाठी भाजप आणि शिंदेंकडून प्रयत्न करण्यात येताहेत.. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये...ज्यांना वाटतं जागा सोडावी त्यांनी त्यांचे मतदारसंघ मनसेसाठी द्यावेत असा टोला  सरवणकरांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय.  माहीम मतदारसंघात अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत हे आमनेसामने आहेत.. तिन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्नास व्यक्त केलाय.. त्यामुळे जनता कुणाला आशिर्वाद देणार हे येत्या 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल...