Maharashtra Assembly Elections 2024 : राजकारणात मैत्रीला किंमत नसते याची प्रचिती येणारी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवाराला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.  छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे. उमेदवारी पक्षाला परत देत असल्याचं त्यांनी सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे किशन तनवाणी यांच्यात थेट लढत होणारे...2014 साली झालेल्या लढतीत थेट एमआयएम पक्षाला फायदा झाला आणि दोघांचं नुकसान झालं...त्यामुळे प्रदीप जयस्वाल मित्र असल्याने त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितल मात्र त्यांनी तसं न केल्यानं अखेर आपल्याला माघार घ्यावी लागल्याचं तनवाणी म्हणालेत...उद्धव ठाकरे देतील त्या उमेदवाराच्या पाठिशी उभं राहणार असल्याचं तनवाणी म्हणालेत...तर तनवाणीच इथे उमेदवार असणार ते नाहीच म्हणाले तर तुल्यबळ उमेदवार देणार असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत...


छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद मध्य संघातून किशनचंद तनवाणी  यांनी माघार घेतली आहे. त्यामुळं आम्ही नवा उमेदवार देतोय बाळासाहेब थोरात असे नव्या उमेदवारांचे नाव आहे. उद्धव ठाकरे यांचा आदेशानुसार किशनचंद तनवाणी यांना जिल्हा प्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले. 


भंडारा विधानसभा मतदारसंघात मविआत बिघाडी झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसकडून पूजा ठाकर यांना उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरे पक्षाकडून नरेंद्र पाळी उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. त्यांना ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचीही माहिती आहे.


कसब्यामध्ये याहीवेळी धंगेकर पॅटर्न चालणार, असा दावा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. धंगेकरांनी कसबा गणपतीची आरती करून उमेदवारी अर्ज भरला. पोटनिवडणुकीत भाजपाच्या हेमंत रासनेंचा धंगेकरांनी पराभव केला होता. आता पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने लढत होणार आहे. 


राज्याचं लक्ष लागून असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनीही अर्ज दाखल केला. या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे असा सामना रंगणार आहे. तर अजित पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवारांचे पुतणे आणि बारामतीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी बारामतीतून अर्ज भरला.


सिंधुदुर्गच्या कणकवली-देवगड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निलेश राणेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी राणेंनी सहकुटुंब त्यांच्या ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतलं. मुंबईत मनसेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी दादर-माहीम मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी त्यांनीबाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे स्मृतिस्थळ आणि चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी अभिवादन केलं. नंतर सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.