Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिकांची उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नाहीये.. राष्ट्रवादीनं उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्यात मात्र त्यात नवाब मलिकांचं नाव नाहीये.. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळणार नसल्याचं चित्र असल्यानं अखेर नवाब मलिकांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय..  29 ऑक्टोबरला मानखुर्द- शिवाजीनगरमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल कऱणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.. .  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राष्ट्रवादीकडून मलिकांना उमेदवारी मिळणार की नाही यावरून सस्पेन्स अद्यापही कायम आहे.. तर दुसरीकडे नवाब मलिक जेष्ठ नेते आहेत.. त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असल्याची सावध भूमिका सुनिल तटकरेंनी घेतलीय..  नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं त्यावरून आता मविआनं महायुतीवर हल्लाबोल केलाय..... कुणाला उमेदवार द्यायची कुणाला द्यायची नाही याचा निर्णय महायुतीत भाजप घेत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय.. 


नवाब मलिकांना उमेदवार देण्यावरून महायुतीत संघर्ष  सुरू आहे.. त्यामुळे त्यांची उमेदवारी वेटिंगवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. त्यातच नवाब मलिकांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात आली.... त्यामुळे पुढील दोन दिवसात काही घडामोडी घडतात का आणि मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळणार का  याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय..