Sharad Pawar Vs Dhananjay Munde: बीडचं मुंडे परिवार आणि शरद पवार यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे.राष्ट्रवादीतील फुटीमागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय शरद पवारांना आहे. आणि यावरूनच धनंजय मुंडेंनी शरद पवारांना आव्हान दिलंय. आणि त्यांचं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय.त्यामुळे मुंडे विरुद्ध पवार असा राजकीय सामना सुरू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गद्दार शब्दावरून धनंजय मुंडेंनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.. शरद पवारांना तुतारीचं आदर्श नेतृत्व म्हणत शाहू कोण आणि गद्दार कोण हे त्यांनी आम्हाला सांगावं का?असा सवालही मुंडेंनी केलाय.. धनंजय मुंडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर गद्दार कोण हे समोरासमोर बसून पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं आव्हानही दिलंय..


धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय. निवडणूक झाल्यानंतर तारीख आणि वेळ मी देईल त्यांनी ठिकाण सांगावं असं म्हणत सुप्रिया सुळेंना धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय.


गेल्या काही दशकांपासून सुरु असलेला मुंडे विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतोय.. राष्ट्रवादीतील फुटीनंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गद्दार असा उल्लेख करण्यात येतोय.यावरूनच धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यात आव्हान प्रतिआव्हानाची लढाई सुरू झालीये.ही लढाई कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.



परळी धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला


परळी हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत. सध्या ते परळीचे विद्यमान आमदार आहेत. अशातच दुसरी विरोधी पक्षाला माझ्या विरोधात उमेदवार उभा करायचा आहे. तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटासाठी जागा आहे. त्याच ठिकाणी 12 ते 15 उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. पण त्या उमेदरांपैकी जे त्यांच्या पक्षाचे निष्ठावंत आहेत, त्यांच्या पैकी कुणालाही उमेदवारी दिलेली नाहीये. मात्र, जे पक्षात नाहीत अशा व्यक्तीला तिथे उमेदवारी दिली आहे. त्यांना परत एकदा समाजात वाद पेटवत ठेवायचा आहे. असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 


शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे? 


विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या टार्गेवर धनंजय मुंडे आहेत का? असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले. होय, विधानसभा निवडणुकीत मला  टार्गेट केलं जात आहे. राजकारणात हे सर्व घडत असतं. प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना लक्ष केलं जात असतं. परंतु एखाद्यावर जास्तच लक्ष दिलं जातं. त्यामुळे माझं काय होईल हे ज्यांनी लक्ष दिलं त्यांच्यावर अधारित नाहीये. गेली अनेक वर्षे मी माझ्या मतदार संघात जी कामे करत आहे, किंवा तेथील जनतेच्या मनात जो मी एक विश्वास निर्माण केला आहे, ती मायबाप जनता ठरवणार आहे, माझं काय करायचं आहे. 


'गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही'


महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाषण केले. या सभेत बोलताना त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची चांगलीच खरडपट्टी काढली. 'आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा असं शरद पवारांनी म्हटल आहे. मंचर येथील सभेत शरद पवार बोलत होते.
ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही, असे शरद पवार दिलीप वळसेंना उद्देशून म्हणाले. आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असे आवाहन पवारांनी केले.