महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, जहाल नक्षलवाद्याला अटक
15 लाखांच बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक
मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबई उपनगरातील नालासोपाऱ्यातून जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. हुलस यादव (45) असे या नक्षलवाद्याचे नाव असून तो मुळचा झारखंडचा रहीवासी आहे. या नक्षलवाद्यावर 15 लाखांचे बक्षीस होते. दरम्यान या घटनेने नालासोपारा परीसरात एकचं खळबळ माजली आहे.
जहाल नक्षलवादी झारखंडमधून मुंबईत उपचारासाठी आला होता.मुबईच्या नजीक नालासोपारा परीसरात तो लपून राहत होता. या संबंधित माहिती एटीएसला (ATS) मिळाली होती. त्यानुसार एटीएसने आज सकाळी नालासोपाराच्या धानीव बाग आणि रामनगर भागातील चाळींवर छापे टाकले. या छाप्यात त्यांनी हुलस यादव या जहाल नक्षलवाद्याला अटक केली. या हुलस यादववर 15 लाखांच बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. तसेच अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये त्याचा समावेश होता.
दरम्यान महाराष्ट्र एटीएसची (ATS) ही मोठी कारवाई असून झारखंड पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.