औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवेसहीत शाळा, बस बंद
खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलीय. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहतील, तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिलेत.
औरंगाबाद : खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलीय. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहतील, तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिलेत.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये अनेक शाळा बंद राहणार आहेत. शाळांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय. पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये, असा शाळांकडून निरोप गेला आहे.
औरंगाबादमध्ये आयुक्तांच्या आदेशानुसार मनपा शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आजचे पेपरही पुढे ढकलण्यात आलेत.