Maharashtra Budget 2023 :  राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (Health News) महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi)


नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज  फडणवीस  यांनी आज विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यविषय योजनेची मोठी घोषणा केली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये करण्यात आले आहे.  त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. तसेच  नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार आहे. राज्य सरकारची किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा, इतक्या कोटींची तरतूद


बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना


 मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत करता येणार आहे. राज्यभरात 700 स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असणार आहे. तसेच निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. 


अंत्योदयाचा विचार


 संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये करण्यात आले आहे.  राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. तसेच  प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित निधी प्रदान करण्यात येईल, अशी माहिती अर्थसंकल्प सादर करताना फडवणीस यांनी दिली.


आदिवासी शिक्षणासाठी तरतूद...


- 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
- अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती


अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ


 - आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली


नवीन महामंडळांची स्थापना..भरीव निधी सुद्धा देणार


- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
- वडार समाज : पैलवान कै.मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार