Malshej Ghat Skywalk: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. शुक्रवारी विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी राज्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठीही काही निधी तसंच, प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात काही तरतूदी करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात असलेल्या माळशेज घाटाबाबतही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. याच माळशेज घाटात आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेची व्हि्विग गॅलरी अर्थात काचेचा स्काय वॉक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. माळशेज घाटात हा काचेचा स्काय वॉक उभारण्यासाठी आता चालना मिळणार असून, त्यामुळे मुरबाड तालुका पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. भारतातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. 


माळशेज घाटात चीन देशातील काचेच्या व्हि्विंग गॅलरी प्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी सादर केला होता. राज्यात पर्यटकांच्या  वाढीसाठी  तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात काचेचा वि्हिंग गॅलरी चा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. भारतातील हा पहिला प्रकल्प असेल. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर, स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत


कसा असेल माळशेज घाटातील स्काय वॉक?


माळशेज घाटात देशातील पहिला पारदर्शक पूल म्हणजेच व्ह्यूविंग गॅलरी बांधण्यात येणार आहे. माळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर हा प्रकल्प बांधण्यात येणार आहे. 18 मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. इतकंच नव्हे तर ही व्ह्यूविंग गॅलरी पारदर्शी म्हणजेच काचेची असल्याने पर्यटकांना खोल दरीचा नजारा अनुभवता येणार आहे. तसंच, पर्यटकांना आकर्षित करणारं निसर्गसौंदर्याचा आनंददेखील घेता येणार आहे. माळशेज घाटात ही व्ह्यूविंग गॅलरी तयार झाल्यावर पर्यटकांचा या घाटाकडे पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.


माळशेज घाटाचे वैशिष्ट्ये काय?


माळशेज घाट हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. उंच डोंगर, टेकडी तसेच विविध धबधब्यांनी नटलेला असा हा परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. विशेष म्हणजे पश्चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत हा परिसर आहे. येथे दुर्मिळ पशू-पक्षी आढळून येतात. इथली खासियत म्हणजे 'रोहित पक्षी' इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे दरवर्षी या जलाशयात येतात.