Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूर राजभवनवर आयोजित करण्यात आला. शपथविधीसह चर्तेत आलाय तो मंत्रीपदासाठीचा फॉर्म्युला. अडीच वर्षानंतर मंत्रीपद साडवे लागले अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून  लिहून घेतले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या फॉर्म्युलासाठी तयार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शपथविधीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे.  आज मिळत असलेले मंत्रीपद हे अडीच वर्षांसाठी असेल. या अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास मंत्रिपद सोडावं लागेल असं त्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे.


महायुतीत मंत्रिपदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला आहे.  काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रिपदं दिले जाणार आहे.  अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झाल्याचे समजते.  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  सांगितले.   अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळे अनेक जिल्ह्यांना संधी मिळणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.