सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!

आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

| Dec 15, 2024, 15:32 PM IST

Saving Account: आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

1/9

सेव्हिंग अकाऊंटमध्ये किती रुपये असल्यास येते आयकर विभागाची नोटीस?

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

2/9

कधी नोटीस येऊ शकते?

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

यासाठी आयकर विभाग व्यक्तीला कधी नोटीस पाठवू शकते? तुमच्या बचत खात्यात किती शिल्लक असायला हवी. किती रुपये असल्यास आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते? जाणून घेऊया.

3/9

10 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

आयकर नियमांनुसार एका व्यावसायिक एका आर्थिक वर्षात त्याच्या बचत खात्यात एकूण रोख रक्कम, अकाऊंटमध्ये जमा किंवा काढली जाणारी रक्कम असा 10 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करु शकत नाही.

4/9

बँकांकडून व्यवहार उघड करणे आवश्यक

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

1 एप्रिल ते 31 मार्च अशा एका आर्थिक वर्षात तुमच्या सर्व बचत खात्यांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त रोख ठेव असल्यास आयकर विभागाला कळवले जात. बँकांनी असे व्यवहार उघड करणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या खात्यात मिळून ही रक्कम असली तरीही तुम्ही अडचणीत येऊ शकता.

5/9

10 लाखांची मर्यादा ओलांडल्यावर काय होते?

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

जर रक्कम 10 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तो हाय वॅल्यू व्यवहार मानला जातो. बँकांनी किंवा वित्तीय कंपन्यांनी आयकर कायदा, 1962 च्या कलम 114B अंतर्गत आयकर विभागाला याची माहिती द्यावी लागते.

6/9

पॅन क्रमांक

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

तुम्ही एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक द्यावा लागतो. तुमच्याकडे पॅन नंबर नसल्यास तुम्हाला फॉर्म 60/61 सबमिट करावा लागतो.

7/9

आयकर सूचनेला कसे उत्तर द्यावे?

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

हाय वॅल्यू रोख व्यवहारांसंबंधी आयकर नोटिसांना प्रतिसाद देताना, पैसे नेमके कोठून आले? हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. यासाठी तुमच्याकडे बँक स्टेटमेंट्स आणि गुंतवणूक रेकॉर्डसह कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

8/9

सल्लागाराचा सल्ला

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

रोखीचा स्रोत घोषित करण्याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास किंवा काळजी वाटत असल्यास कर सल्लागाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

9/9

रोख व्यवहारसंबंधी कलम

When Income Tax Department issue Notice How much money does in savings account

रोख व्यवहार संबंधी कलम 269ST नुसार, एका दिवसात कोणत्याही इतर व्यक्तीकडून 2 लाखांपैक्षा जास्त रक्कम घेऊ शकत नाही. कोणत्याही एका व्यवहाराच्या संदर्भात 2 लाखाहून अधिक रक्कम दिली-घेतली जाऊ शकत नाही. किंवा एकाच कार्यक्रम किंवा प्रसंगाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी झालेल्या व्यवहाराच्या संबंधातही हा नियम लागू होतो.