स्वस्त आणि मस्त! मुंबई व परिसरात आहेत भन्नाट पर्यटनस्थळ; मुलांना घेऊन जाच

Dec 15, 2024, 14:25 PM IST
1/7

स्वस्त आणि मस्त! मुंबई व परिसरात आहेत भन्नाट पर्यटनस्थळ; मुलांना घेऊन जाच

places to visit in Mumbai during christmas and new year

मुलांना आता नाताळ आणि नव वर्षाच्या सुट्ट्या लागतील. अशावेळी मुलांना व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून त्यांना मुंबई व मुंबईलगतच्या या रम्य स्वस्त ठिकाणी फिरवून आणा. 

2/7

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी ही मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर वसली आहे. 1987 साली युनेस्को जागतिक पुरातन वास्तू म्हणून घोषित केले. येथे तुम्ही मुलांना घेऊन जाऊ शकता. 

3/7

दक्षिण मुंबई

दक्षिण मुंबईत तुम्ही मुलांसोबत संपूर्ण एक दिवस छान फिरु शकता. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, हँगिग गार्डन कुलाबा, राणीची बाग या ठिकाणी तुम्ही मुलांना घेऊन जावू शकता. 

4/7

मुंबई उपनगरातील बोरीवली येथील गोराई बीच व नॅशनाल पार्कमध्येही तुम्ही मुलांसोबत छान वेळ घालवू शकता. या ठिकाणी काण्हेरी लेणीदेखील पाहण्यासारखी आहे

5/7

माळशेज घाट

मुंबईपासून 125 किमी अंतरावर असलेल्या माळशेज घाट हा अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे. थंड वातावरण आणि हिरव्यागार डोंगररागामुळं मुलांनाहे हे ठिकाण आवडेल

6/7

माथेरान

मुंबईलगतच्या शहरात वसेलेल माथेरान हे सुंदर हिल स्टेशन आहे. येथून संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगांचे दर्शन होते. 

7/7

अलिबाग

सुंदर समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा यासाठी ओळखले जाते. दोन दिवसांत आरामात तुमचं अलिबाग फिरुन होईल.