मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. देशात राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाचाही वेग वाढविण्यात आला आहे. मात्र, लोक कोविड-19च्या (covid-19) नियमांचे पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे जे व्हायचे तेच होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. तसेच कोरोना बाधित मृत्यूचा आकडही वाढत आहे. आता तर लहान मुलांना कोरोनाची बाधा होत आहे. नवा कोरोनाचा स्ट्रेन घातक आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा विचार होत आहे. मात्र, विरोधकांकडून लॉकडाऊनला विरोध होत आहे. याला आता सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पुन्हा एकदा आघाडी सरकारमधील  गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'टीका करणे सोपे आहे, पण उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) होणे अवघड आहे', असे त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे.


फडणवीस यांना आव्हाड यांचा टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यात कोरोनाने  थैमान दिसून येत आहे. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानापर्यंत याची झळ पोहोचली आहे. तसेच सरकारी निवासस्थान वर्षावरही काही जण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे विलगीकरणात आहेत. तर रश्मी ठाकरे यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कामात व्यस्त आहेत, असे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि  मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले आहे.



मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे याच्या कार्याला सलाम केला आहे. ते म्हणाले आहेत की, “पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. 'टीका करणे सोपे आहे, पण उद्धव ठाकरे होणे अवघड आहे'. स्वत:च्या ह्रदयात अनेक स्टेन्स असतानादेखील ज्या पद्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळत आहे. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!”.