CM ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या फडणवीस यांना आव्हाड यांचा टोला

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायाला मिळत आहे. लोक साधी काळजी घेत नाहीत. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन  (Lockdown) लावण्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले. 

Updated: Apr 3, 2021, 10:43 AM IST
CM ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या फडणवीस यांना आव्हाड यांचा टोला title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायाला मिळत आहे. लोक साधी काळजी घेत नाहीत. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन  (Lockdown) लावण्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जनतेला संबोधित करताना सूचित केले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. परदेशातील उदाहरणे ठिक आहेत. त्यांनी काय उपायोजना केल्या आहेत, त्या पाहा असे म्हणत ट्विट केले. या ट्विटला आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंंद्र आव्हाड यांंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खोचक टोला लगावला आहे. (Jitendra Awhad Taunts Devendra Fadnavis)

कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडावी लागेल. यासाठी लॉकडाऊनची गरज आहे. परदेशात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट आली आहे. त्यांनी लॉकडाऊन लावला. तरीही त्यांची वाईट अवस्था झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी लोक काळजी घेत नाहीत. रस्त्यावर मास्क शिवाय फिरताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा विचार पुढे येत आहे. लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या इशाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इशारा कसला देता मदतीसाठी रस्त्यावर उतरा आणि काम करा, असे फटकारले.

दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांंनी दिले आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. जगभरच्या देशांतील परिस्थितीची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे. त्याला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जगातील देशांनी केलेल्या उपाययोजनांचा पाढा वाचला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना टोल लगवला आहे. 

लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांनी आणि उद्योगपती यांनी मला कोरोना रोखण्याचा उपाय सूचवा, असे आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे. जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन लागल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्याला उत्तर म्हणून फडणवीस यांनी  ट्वीट केले आहे. जगभरातील देशांनी लॉकडाऊन लावला असला तरी त्यांनी आपापल्या जनतेसाठी आर्थिक पॅकेज दिली आहेत. डेन्मार्कने एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज दिले. ग्रीसने 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत केली. बेरोजगारांना 800 युरोंपर्यंत मदत दिली. त्यामुळे तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे, असे फडणवीस यांनी ट्टिट करताना म्हटले आहे.

फडणवीस यांच्या या ट्वीटला आव्हाड यांनी जोरदार उत्तर दिले आहे. 'फ्रान्स, जर्मनी, युकेच्या नागरिकांना दिली गेलेली मदत ही तिथल्या केंद्र सरकारने दिली आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरुन, असा खोचक सल्ला आव्हाड यांनी फडणवीस यांना दिला आहे.