मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. आज 4, 110 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 60, 94, 816 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता रिकव्हरी रेट 96.59 वर पोहोचला आहे. तर राज्यात आज 6,479 नव्या लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 157 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राज्यात 4 लाख 67 हजार 986 लोक होमक्वारंटाइन आहेत. तर 3 हजार 117 व्यक्ती या क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. राज्यातील 11 जिल्हे वगळता हळूहळू सगळीकडे कोरोग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. मात्र अद्यापही धोका टळला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनाला हलक्यात न घेण्याचं आवाहन केलं जात आहे. 


अहमदनगर जिल्ह्यात  आज नव्या ९४३ बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ही वाढणारी संख्या चिंतेची बाब ठरली आहे. नगर जिल्ह्यात आज 1012 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 5236 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


जळगाव जिल्ह्यात आज 04 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1, 42, 605वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 39 हजार 953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


येवलामध्ये 06 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 260 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 332 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात घरी घरी परतले आहेत.