मुंबई : Character verification of teachers and non-teaching staff : येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक, प्रशासक, कर्मचारी, शिपाई यांची चारित्र्य पडताळणी शिक्षण विभाग करणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लवकरच सर्वच माध्यम आणि व्यवस्थापनाच्या शाळांना आदेश देण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षणाधिका-यांवर असेल असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्यांवर शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना काय उपाययोजना करणार, असा प्रश्नही पालकांतून उपस्थित होत आहे.


त्यामुळे शिक्षकांची वागणूक कशी आहे, काही गुन्हे, चौकशी तर नाहीत ना यासंबंधी कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करण्याचा विचार शिक्षण विभागात सुरु आहे. (Education Department will conduct character verification of teachers and non-teaching staff )