Mumbai News : पुढच्या वर्षाची सुरुवात होत नाही, तोच राज्य शासनानं नागरिकांना खास भेट दिली आहे. ज्या दिवसांची मुंबईकर (Mumbai) आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात राज्य सरकारने दहीहंडी (Dahihandi) आणि अनंत चतुर्दशी (anant chaturthi) या सणांच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये दहीहंडी 7 सप्टेंबर रोजी तर, अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर रोजी असणार आहे. या दिवशी मुंबई आणि उपनगरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद राहतील, असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा : Solapur Crime : स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा, 'या' शहरांमधील भक्तांची फसवणूक...


दोन महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त आणखी काही सुट्ट्यासुद्धा नव्या वर्षात तुमची वाट पाहत आहेत. चला तर, मग पाहुया 2023 मधील सुट्ट्यांची यादी. (Maharashtra Public Holidays)


Maharashtra Public Holidays


26 जानेवारी- प्रजात्ताक दिन 
18 फेब्रुवारी- महाशिवरात्री 
19 फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती 
7 मार्च - होळी 
22 मार्च- गुढीपाडवा 
30 मार्च - रामनवमी 
4 एप्रिल - महावीर जयंती 
7 एप्रिल- गुड फ्रायडे 
14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
1 मे- महाराष्ट्र दिन 
5 मे- बुद्धपौर्णिमा 
28 जून - बकरी ईद 
29 जुलै- मोहरम 
15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन 
16 ऑगस्ट- पारसी नववर्ष 
19 सप्टेंबर - गणेश चतुर्थी 
28 सप्टेंबर - ईद ए मिलाद 
2 ऑक्टोबर- गांधी जयंती 
24 ऑक्टोबर - दसरा 
12 नोव्हेंबर - दिवाळी लक्ष्मीपूजन 
27 नोव्हेंबर - गुरुनानक जयंती 
25 डिसेंबर - नाताळ