नागपूर :  कोरोना काळात ( Corona period) आम्हाला गर्दी करण्याचा शौक नाही. सरकार (Maharashtra government) जाग झाले असत तर आम्हाला आंदोलन करावे लागले नसते. राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे सरकारला जाग करण्यासाठी गर्दी करण्याची वेळ या सरकारने आमच्या आणली आहे. जे करण्याची वेळ येईल ते-ते आम्ही करणार, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा राज्यात चांगला तापला असून भाजपच्यावतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेत आकाशवाणी चौकात भाजपने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्यात, तब्बल अर्धा तास जालना रोड आंदोलकांनी अडवून धरला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं...मात्र या आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूकीचा खोळंबा झाला. भाजप नेत्यांना कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमावलीचा देखील विसर पडलेला दिसला.


खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जळगावमध्ये चक्का जाम आंदोलन केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात भाजप खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्त्वाखाली आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक वळवल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाल्याने कार्यकर्त्यांनी धावपळ करत वाहने अडवली. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांची देखील तारांबळ उडाली. 



भंडारा येथे राष्ट्रीय महामार्ग नागपूर-रायपूर हायवे येथे भाजपच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक पवित्र घेतला असून भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे आमदार, भाजप नेते परीणय फुके यांच्या नेतृत्वाखाली भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले. सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर ते रायपूर  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जवळपास अर्धा तास आंदोलनकारी रस्त्यावर बसले असताना  वाहतूक ठप्प झाली होती.


गोंदियात ओबीसी आरक्षण प्रश्नावर भाजपने बैलगाडी मोर्चा काढला. शेकडो बैलगाड्यांसह भाजपा कार्यकर्ते  रस्त्यावर उतरले. कोहमारा येथील मुंबई - हावडा राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. राष्ट्रीय महामार्ग 6 वर हजारो भाजप कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. ग्रामीण भागातून ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.