मुंबई : महाराष्ट्रात लवकरच घरोघऱी लसीकरण मोहिम सुरू करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे. घरोघरी लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुण्यातून प्रायोगित तत्वावर या माहिमेची सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे. तसंच राज्य सरकारने हे देखील सांगितले की, ते लसीकरणासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला होता. त्यानंतर न्यायालयाने केरळ, बिहार, झारखंडने केंद्रची परवानगी घेतली होती का? अशी विचारणा राज्य सरकारला करत, त्यांच्य़ा अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.


त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने आज म्हणजेच 30 जून ला मुंबई हायकोर्टात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचे स्पष्ट करत, घरोघरी लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.


ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे.


या मोहिमेसाठी राज्य सरकार खास वेबसाईट आणि फोन नंबर तयार करणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर याची चाचपणी करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.


राज्य सरकारने लसीकरण मोहिम घरोघरी सुरु करण्याचा निर्णय तर घेतला, परंतु असे असले तरी राज्यात सध्या अनेक ठिकाणी लसींची कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे राज्यातील नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, बीड, वसई-विरार, नालासोपाऱ्यात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना लस न घेताच घरी जावे लागले आहे. ज्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.


कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर भारतीयांना आता ९ देशात प्रवास करता येणार आहे. दक्षिण आफ्रीका, तुर्कस्थान, केनिया, मॉरीशस, सौदी अरेबिया, टांझानिया, युक्रेन,या देशांमध्ये भारतीयांना आता प्रवास करता येणार आहे. यापूर्वी भारतात कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या जास्त असल्याने बऱ्याच देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर त्याचप्रमाणे प्रवाशांवर बंदी घातली होती.