मुंबई : Marathi language schools compulsory : राज्यभाषा मराठीबाबत  (Marathi language) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तशा शाळांना सूचना देण्यात आला आहेत. मराठी न शिकवणाऱ्या शाळांना मोठा झटका देण्याची तयारी सरकारने केली आहे. मराठी न शिकवल्यास एक लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. (Maharashtra government's big decision, fines for schools that do not teach Marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी शिकविण्याबाबत (Marathi language) सर्व माध्यमांच्या शाळांना शिक्षण विभागाच्यावतीने सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता सर्वमाध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून पुढे राज्यातील सर्व माध्यमाच्या शालांना मराठी भाषा शिकवणे बंधनकारकर असणार आहे. ज्या शाळा या नियमांची अंमल बजावणी करणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. 


मराठी न शिकविणाऱ्या शाळांकडून एक लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व माध्यांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारकर असणार आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये मराठीचे शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी महाराष्ट्र मराठी भाषा शिकणे आणि शिकवणे कायदा 2020 राज्यसरकारकडून संमत करण्यात आला आहे.