Maharashtra IAS Officer Puja Khedkar Message : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे प्रताप दररोज उघड होत आहेत. खासगी ऑडी कार वापरल्यानं, परवानगी न घेता ऑडीवर महाराष्ट्र शासन असा स्टिकर आणि अंबर लाल रंगाचा दिवा लावल्यानं, वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिन बळकावल्यानं पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती झाली तेव्हा मुलीच्या केबिनसाठी हेच दिलीप खेडकर अधिकाऱ्यांना दमदाटी करत होते, असा आरोपही केला जातोय. अशातच आता पूजा खेडकर यांची मेसेज चॅट व्हायरल झाले आहेत.


व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काय लिहिलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा खेडकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्यामध्ये व्हायरल झालेले चॅटमध्ये पूजा खेडकर कागदपत्रांविषयी बोलताना दिसत आहे. मी पूजा खेडकर, पुणे जिल्हाधकारी कार्यालयात प्रशिणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होत आहे. डॉ. दिवसे सरांनी तुमचा नंबर दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातून माझे काही कागदपत्र पाठवविले गेलेत पण ते मला सापडत नाहीत, असं पूजा खेडकर म्हणताना दिसतायेत.


आपण सोमवारी कागदपत्रे शोधू, असं उत्तर अधिकाऱ्याने दिल्यानंतर पूजा खेडकर यांनी सरकारी व्यवस्थेवर प्रश्न विचारणं सुरू केलं. मी रुजू होण्याआधी ही सर्व व्यवस्था झाली पाहिजे. त्यादृष्टीने मला नियोजन करता येईल, असं पूजा खेडकराने म्हटलं होतं. त्यावेळी पूजा खेडकरने अधिकाऱ्यांना इशारा देखील दिल्याचं दिसतंय. 


वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना 21 हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय. ऑडी कारवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलीये. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी कारवर अंबर दिवा लावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अशी पाटीली लावली होती. याप्रकरणी पोलीस चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलेत. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 


दरम्यान, पोलीस खेडकरांच्या बंगल्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर पोलिसांनी आवाज देऊनही कुणी गेट उघडले नाही. उलट पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमे-यावर धावून गेल्या. माध्यमांना चित्रीकरण करण्यास मनोरमा खेडकर विरोध करत होत्या.