Maharashtra Investment News : राज्यात 45900 कोटींची गुंतवणूक, डाव्होस येथे सामंजस्य करार
Investment News : महाराष्ट्र राज्याला 45900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यात यश आले आहे. (Maharashtra Investment) यामुळे प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. (Maharashtra News in Marathi)
Maharashtra Investment News : डाव्होसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला 45900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यात यश आले आहे. (Maharashtra Investment) यामुळे प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. (Maharashtra News in Marathi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झालेत. (Memorandum of understanding)
डाव्होस स्वित्झर्लंड येथील डाव्होस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
सामंत म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी सांगितली.
करण्यात आलेल्या सामंजस्य कारारा बद्दल माहिती
1. Greenko energy Projects Pvt.Ltd 12000 कोटींची गुंतवणूक
2. Berkshire Hathaway Home Services Orenda India 16000 कोटींची गुंतवणूक
3. ICP Investments/ Indus Capital 16000 कोटींची गुंतवणूक
4. Rukhi foods 250 कोटींची गुंतवणूक
5. Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. 1650 कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्राबाहेर दोन मोठे उद्योग गेल्याने टीका
दरम्यान, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दोन मोठे उद्योग गेल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होत होती. वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि शेजारच्या गुजरातमध्ये हलवण्यात आलेल्या टाटा-एअरबस डिफेन्स एअरक्राफ्ट निर्मिती उपक्रमासह महाराष्ट्राबाहेर हलवल्या जाणाऱ्या अनेक मेगा प्रकल्पांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. ठाकरे गटाकडूनही टीका करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर चांगली गुंतवणूक महाराष्ट्रात होत असल्याने याला अधिक महत्व आले आहे.