Maharashtra Kesari 2023 यंदाचा `महाराष्ट्र केसरी` होणार लखपती, विजेत्या पैलवानांवर बक्षिसांची उधळण!
यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) थरार येत्या 10 जानेवारीपासून रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) या वर्षाच्या महाराष्ट्र केसरीचे आयोजक आहेत. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षिसांची खैरात होणार आहे.
Maharashtra Kesari 2023 : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) थरार येत्या 10 जानेवारीपासून रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) या वर्षाच्या महाराष्ट्र केसरीचे आयोजक आहेत. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षिसांची खैरात होणार आहे. महिंद्राची थार गाडी, ट्रॅक्टर आणि जावाच्या 18 टू-व्हीलर देण्यात येणार आहेत. (Maharashtra Kesari 2023 winner will get a Mahindras Thar car latest marathi News)
यंदाच्या स्पर्धेमध्ये राज्यातील 45 तालीम संघातील विविध 18 वजनी गटात सुमारे 900 पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 14 जानेवारीला संंध्याकाळी 'महाराष्ट्र केसरी' किताबाकरता अंतिम लढत होणार आहे. कोथरूडमधील (Kothrud) कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून, त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत.
कुठे होणार यंदाची स्पर्धा आणि विजेत्यांना बक्षीसे
'महाराष्ट्र केसरी'च्या विजेत्याला रोख 5 लाखांचे बक्षीस, थार गाडी आणि उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 18 वजन गटातील विजेत्यांना 18 जावा कंपनीच्या गाड्या विजेत्यांना देण्यात येणार आहेत. त्यासोबतच कुस्तीपटूंची राहण्याची, जेवणाची व्यवस्था आणि क्वालिटी किटही देण्यात येणार असल्याचं 'महाराष्ट्र केसरी'चे प्रमुख संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
दरम्यान, अनेक नामांकित मल्ल स्पर्धेत सहभागी होणार असून यामध्ये गतविजेता पृथ्वीराज पाटील, बाला रफीक शेख, सिकंदर शेख, अभिजीत कटके, किरण भगत यांच्यासह सर्व मल्ल आपली वर्षभर केलेली मेहनत पणाला लावताना दिसतील. या स्पर्धेत कोण कोणाला आसमान दाखवणार याकडेही कुस्ती शौकिनांचं लक्ष लागलेलं आहे.