Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झालीय. 147 पैकी 145 समित्यांचे निकाल हाती आले असून, तब्बल 79 बाजार समित्यांमध्ये (Bajar Samiti) महाविकास आघाडी विजयी झालीय. तर भाजप-शिवसेना युतीला (BJP-Shivsena) 29 जागा मिळाल्यात. 37 जागांवर इतर आघाड्यांना यश मिळालं. बाजार समित्यांच्या निकालांवरुन मविआ आणि भाजपनं वेगवेगळे दावे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का
बीड जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) जोरदार धक्का दिलाय. पंकजा मुंडेंचं होम पीच असलेल्या परळी मध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झालाय. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 11 जागांवर विजय मिळवलाय. तर दुसरीकडे प्रतिष्ठेच्या अंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. एकूण 18 जागांपैकी 15 जागांवर मविआने बाजी मारलीय. तर भाजपला फक्त तीनच जागांवर विजय मिळालाय. तर हा निकाल आम्हाला अपेक्षित होता असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं अभिनंदन केलंय. 


बारामतीचा गड राखला
बारामतीचा गड राष्ट्रवादी काँग्रेसनं गड राखला. इथं अजित पवारांनी एकहाती वर्चस्व मिळवलं. अनेक वर्षापासून पवारांचंच बाजार समितीवर वर्चस्व आहे. 17 पैंकी 17  जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. अठरावा एक उमेदवार याआधीच बिनविरोध विजयी झाला होता. भाजपचा  दारुण पराभव झालाय. 


संगमनेरमध्ये थोरातांची सत्ता
संगमनेर बाजार समितीवर बाळासाहेब थोरातांची (Balasaheb Thorat) सत्ता आलीय. विखे पाटलांच्या (Vikhe Patil) पॅनेलला खातंही उघडता आलं नाही. सर्वच्या सर्व 18 जागा थोरात गटानं मिळवल्यायत. प्रतिष्ठेच्या लढतीत थोरातांची सरशी झालीय. विखे पाटलांच्या सगळ्या उमेदवारांचा पराभव झालाय. 


मालेगावमध्ये दादा भुसेंना धक्का


मालेगावमध्ये पालकमंत्री भुसेंना (Dada Bhuse) जोरदार धक्का बसलाय. सोसासायटी गटाच्या 11 जागांपैकी 10 जागेवर महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचं पॅनल विजयी झालंय. दादा भुसे यांच्या पॅनलचा अवघा 1 उमेदवार विजयी झाला आहे. अद्वय हिरे यांनी मतदान केंद्रावर भेट दिली. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष केला. 


कर्जतमध्ये चुरशीची लढत
अहमदनगरमधल्या कर्जत बाजार समिती निवडणुकीचा 18 जागेचा निकाल हाती आले असून बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांना समान कौल मिळालाय. भाजप आमदार राम शिंदे गटाला  9 तर रोहित पवारांच्या गटाला 9 जागा मिळाल्यात. त्यामुळे कर्जतच्या बाजार समिती नेमकी कोणाच्या ताब्यात जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


संभाजीनगरात भाजप-शिंदे गटाचा झेंडा
संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आणि शिंदे गटाचा झेंडा फडकलाय. 15 पैकी 11 जागांवर भाजप आणि शिवसेना युतीने विजय मिळवलाय. तर महाविकास आघाडीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. हरिभाऊ बागडेंनी माजी आमदार कल्याण काळेंना धक्का दिलाय. या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर विजयी जल्लोष करण्यात आला. 


जिल्हा एकूण मविआ युती इतर 
नागपूर 4 3 0 1
अमरावती 6 5 0 1
बुलढाणा 5 3 2 0
वर्धा 4 4 0 0
यवतमाळ 7 4 2 1
अकोला 3 1 0 2
वाशिम 2 2 0 0
भंडारा 2 0 0 2
गोंदिया 4 1 1 2
चंद्रपूर 9 1 0 8
गडचिरोली 4 0 0 4
संभाजीनगर 3 0 2 1
धाराशिव 8 5 3 0
नांदेड 4 3 0 1
बीड 6 5 1 0
परभणी 7 4 2 1
हिंगोली 1 0 0 1
लातूर 4 2 2 0
पुणे 9 6 0 3
सातारा 1 0 1 0
सांगली 5 4 0 1
नाशिक 12 10 0 2
धुळे 1 0 1 0
अहमदनगर 7 4 2 1
नंदूरबार 6 2 1 3
जळगाव 6 2 3 1
सोलापूर 4 1 3 0
रायगड 6 6 0 0
रत्नागिरी 1 0 0 0
पालघर 2 1 1 0
ठाणे 2 0 2 0
एकूण 145 79 29 37