Maharashtra Lockdown 2 : काय बंद, काय सुरू? वाचा संपूर्ण नियमावली
लॉकडाऊनमध्ये या गोष्टींना मिळणार सूट
मुंबई : महाराष्ट्रात दुसरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्यापासून पुढील 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी लावण्यात येत आहे. कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन जाहीर करणं महत्वाचं होतं. अशावेळी सरकारने काही गोष्टींमध्ये सूट दिली आहे. ती सूट नेमती कशात आहे. जाणून घेऊया.
लॉकडाऊन 2 मध्ये यांना सूट
रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसी, फार्मा कंपन्यांचे उत्पादन आणि वितरण युनिटला सहाय्य करणारू वाहतूक आणि पुरवठा साखळी यांना सूट देण्यात आली आहे.
लस, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल युनिट्स, त्यांचे सहाय्य सेवा, उत्पादन आणि वितरण यांना देखील सूट दिली आहे.
तसेच जनावरांचे रूग्णालय व सेवा, पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने, किराणा सामान, भाजीपाला, फळ विक्रेते,डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने, कोल्ड स्टोरेज, गोदाम सेवा.
सार्वजनिक वाहतूकीत विमान,रेल्वे, टॅक्सी, ऑटो, बसेस यांना सूट देण्यात आली आहे.
तसेच देशांच्या Diplomat कार्यालयाशी संबंधित सेवा, RBI आणि RBI ने आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवांना सूट देण्यात आली आहे. SEBI ची सर्व कार्यालये, स्टांक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन, मान्सून पूर्व सेवा/कर्मचारी, दूरसंचार सेवा, दूरसंचार दुरूस्त करणारी आवश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.