राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण, ३४६ जणांचा मृत्यू
राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनाचे ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातला बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.
राज्यामध्ये आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ६,२८,६४२ एवढी झाली आहे. यापैकी १,६०,४१३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २१,०३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला सध्याचा मृत्यूदर हा ३.३५ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत पुण्याने मुंबईला मागे टाकलं आहे. पुण्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या १,३७,६०१ एवढी झाली आहे, तर मुंबईमध्ये हीच संख्या १,३१,५४२ एवढी आहे. पुण्यात कोरोनामुळे ३,४२२ जणांचा मृत्यू झाला, मुंबईमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ७,२६८ एवढी आहे.
मुंबईमध्ये आत्तापर्यंत १,०६,०५७ रुग्ण बरे झाले आहेत, तर १७,९१४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. पुण्यात ९३,५१४ रुग्ण बरे झाले असून ४०,६६५ जणांवर उपचार सुरू आहेत.