सुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेऊन गेलेली बस `येथे` थांबली
अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे. बैठकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना बसमधून घेऊन जाणार आहेत.
Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. महाराष्ट्रात काका पुतण्याचा वाद शिगेला पोहचला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद आता अत्यंत धक्कादायक वळणावर येवून पोहचला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या एमईटीमधल्या बैठकी दरम्यान मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे. बैठकीनंतर आमदारांना बसमधून नेले जाणार आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना घेऊन निघालेली ही बस वांद्र्यातील ताज हॉटेलवर थांबली आहे. सर्व आमदारांना एकत्र ठेवणा. येथून पुढे ही बस कुठे जाईल हे समजू शकलेले नाही. या आमदारांना अज्ञात स्थळी ठेवले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाळी आहे. याबद्दल राजकाकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार गाटासह असलेले आमदार
छगन भुजबळ, धर्मरावबाबा आत्राम, माणिकराव कोकाटे, मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी मोरगाव, अण्णा बनसोडे, अजित पवार,
दिलीप वळसे पाटील, संग्राम जगताप, दत्ता भरणे, संजय बनसोडे, अदिती तटकरे, दिलीप मोहिते, धनंजय मुंडे
आमदारा फूटू नये म्हणून अजित पवार अलर्ट मोडवर
आमदारा फूटू नये म्हणून अजित पवार अलर्ट मोडवर आल्याचे दिसत आहेत. आमदार फुटू नयेत म्हणून अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवले जाणार असल्याचे समजते.
दोन्ही गटाकडून पॉवरफुल शक्ती प्रदर्शन
अजित पवार आणि शरद पवार गटाची मुंबईत महत्त्वाची बैठक आहे. दोन्ही गटाकडून पॉवरफुल प्रदर्शन सुरु आहे.. कोणात किती दम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून केला जात आहे. वांद्रेतल्या एमईटीमध्ये अजित पवार गटाची बैठक आहे तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची बैठक आहे. दोन्ही ठिकाणी कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
अजित पवार यांचा मोठा गट शिंद फडणवीस सरकार मध्ये सामील झाला आहे. 2 जुलै रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंद फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळेराष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.तर, दुसरीकडे शरद पवार गट देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे.