मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : वर्ध्यातून (Wardha) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. वर्ध्यात विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. मंदिरावर झेंडा चढवत असताना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या पिपरी मेघे येथील तुळजाभवानी मंदिरात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक सावरकर (वय 55), बाळू शेर (वय 60)आणि सुरेश झिले (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घडली घटना आहे. मृत तिघेही मंदिरावर झेंडा लावत असताना हा प्रकार घडला. झेंड्याचा लोखंडी खांब लागला विद्युत तारांना लागल्याने तिघांना जोरदार झटका बसला. विद्युत ताराला मंदिराच्या झेंड्याचा लोखंडी खांबाचा स्पर्श होताच विद्युत प्रवाहाचा झटका लागताच तिघेही खाली कोसळले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 


नेमकं काय घडलं?


पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावायला तीन गावकरी चढले होते. मंदिरातील झेंड्याचा लोखंडी खांब हा 25 फूट उंचीचा होता. झेंडा वरती चढवत असताना लोखंडी खांबाचा तोल सुटला आणि तो शेजारी असलेल्या 33 केव्हीच्या विजेच्या तारेवर पडला. त्यामुळे तिघांनाही विजेचा जोरदार धक्का लागला. विद्युत प्रवाहाचा जोरात झटका बसल्याने तिघेही मंदिराच्या शेडवरच पडले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.