रायगड-मुंबई महामार्गावर 4 तरुणांचा अपघाती मृत्यू! डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ थांबवली अन् तितक्यात...
Mumbai Raigad Accident News: रायगड-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Mumbai Raigad Accident News: रायगड-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॉर्पिओ गाडीला टोइंग व्हॅनने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री दीड वाजता ही अपघाताची घटना घडली.
रायगड-गोवा महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉर्पिओ गाडीला टोइंग व्हॅनने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीचा चक्काचुर झाला आहे. अपघातानंतर जीप जवळपास 50 मीटर दूर फेकली गेली. तर गाडीबाहेर उभ्या असलेल्या सहा जणांना टोइंग व्हॅनने धडक दिली. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरून महाडकडून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉपिओ जीपमधील डिझल संपल्याने गाडी बाजुला उभी करून गाडीतील सहा जण गाडी शेजारी उभे होते. मागुन येणाऱ्या टोईंग व्हॅनने बंद स्कॉपिओला जोरदार धडक दिली. टोईंग व्हॅनच्या धडकेने स्कॉपिओ जीप सुमारे 50 मीटर लांब उडवली गेली आणि सर्व्हीस रोडच्या पलिकडे खड्डयात पडली. अपघाता दरम्यान स्कॉपिओजवळ उभे असलेल्यांना जोरदार टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण जखमी झाले आहेत. सूर्यकांत मोरे, साहिल शेलार वय वर्ष 25 आणि प्रसाद नातेकर 25, समिप मिंडे वय वर्ष 35 सर्व रहाणार महाड अशी मयतांची नाव आहेत. तर, सुरज नलावडे वय वर्ष 34 आणि शुभम माटल वय वर्ष 26 शिरगाव हे जखमी झाले आहेत.
ट्रकच्या चाकाखाली येऊन एका शाळकरी मुलीचा मृत्यू
नाशिकच्या ओझर येथील सावित्रीबाई फुले चौक परिसरात असलेल्या गडाख कॉर्नर कॉर्नर येथील पुला खाली ट्रकच्या चाकाखाली येऊन एका शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. स्कुटी वरून टन मारत असतानाच मागून येणाऱ्या वेगवान ट्रक खाली येऊन नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. अर्पिता शिंदे असं मृत्यू झालेल्या नऊ वर्षे मुलीचे नाव आहे. या अपघातात आई आणि बहीण यादेखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना ह्या चुमुकलीचा या अपघात जीव गेलाय...विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी पोलिसांकडून रेझिंग डे देखील साजरा करण्यात आला होता.