सांगोला : सबसे कातिल गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलचं नाव पोहोचलं आहे. राज्यातल्या कोणत्याही भागात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम असू दे, लोकांची तुफान गर्दी पाहिला मिळते. लोकं झाडावर चढून, घराच्या-दुकानाच्या छतावर चढून गौतमीचा डान्स पाहताना दिसतायत. पण गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा झालाच पाहिजे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा असं जणून समीकरणंच बनलं आहे. नाशिकमध्ये तर मीडियाच्या काही कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगोल्यात तगडा पोलीस बंदोबस्त
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला (Sangola) तालुक्यात गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आबा मोटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी पाहाता सांगोल्यातील कार्यक्रमात तगडा पोलीस बंदोबस्त  ठेवला गेला होता. यात तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात होते. पोलीस बंदोबस्ताच्या खर्चापोटी आबा मोटे यांनी पाच लाख रुपये पोलीस स्टेशनला जमा केले. 


कार्यक्रमापेक्षी बंदोबस्ताचा खर्च जास्त
गौतम पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, वाद आणि मारहाण असे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबरोबरच पेड पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांना पैसै द्यावे लागणार आहेत. म्हणजेच गौतमीच्या मानधनापेक्षा दुप्पट रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे. 


'गौतमी पाटील महाराष्ट्राचा बिहार करू नका'
दरम्यान, छोटा पुढारी अर्थात घन:शाम दराडेनं गौतमीला खडेबोल सुनावलेत. महाराष्ट्राचा बिहार करू नका आणि तसं झालं तर चुकीला माफी नाही अशा शब्दात छोट्या पुढारीनं गौतमीची कानउघाडणी केलीय. याला गौतमी पाटीलनेही प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रचा बिहार केल्याचा आरोप चुकीचा असल्याचं गौतमीने म्हटलंय. तसंच आपण महाराष्ट्राची संस्कृती जपत आहोत, मी चांगल्या पद्धतीने नृत्य सादर करत आहे असं सांगत गौतमीने इतर महिला दिसत नाहीत का? असा सवलाही उपस्थित केला आहे. 


गौतमीच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण
नाशिकमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. यावर बोलताना गौतमीने पत्रकारांना धक्काबुक्की होणं चुकीचं आहे, असं म्हटलं आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे. मला त्या गोष्टीची माहिती नव्हती. मी कार्यक्रमातून निघाले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मला कळलं. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका अशी विनंती गौतमीने तिच्या चाहत्यांना केली आहे.