Maharashtra Politics : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर (Maharashtra  Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) घटनापीठासमोर सुनावणी पार पडली आहे. शिवसेनेतील (shivsena) फुटीनंतर आमदारांची अपात्रता, शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे याप्रकरणी सुनावणी पार पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली.


सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठाने भारतीय निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे गटाचा (shinde group) खरा शिवसेना (shivsena) असल्याचा दावा करण्यापासून रोखण्यास नकार दिला.



दिवसभराच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायलायने फेटाळला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजात मध्यस्थी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णर्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे तर ठाकरेंसाठी हा मात्र मोठा धक्का आहे.


निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला खरी शिवसेना कोणाची या केलेल्या कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लगेच या प्रकरणात मोठा निर्णय न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगातील हे प्रकरण अद्याप प्रलंबित होते. अशातच आता शिंदे गटाने नवी खेळी करत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. 


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आता शिंदे गटाला दिलासा देत पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला मार्ग मोकळा करुन दिला आहे