मुंबई : Maharashtra Political Crisis : शिवसेनेचा 'धनुष्यबाण' (dhanush baan) मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्यासोबत सध्या 40 च्या वर आमदारांची संख्या आहे. हे सगळं सुरु असताना 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. 


आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती मिळत आहे.


नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशी शक्यता आहे. रविवार 3 जुलै रोजी शपथविधी असल्याची माहिती 'झी 24 तास'ला सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.


एकनाथ शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. आज राज्यपालांना पत्र पाठवून मविआकडे संख्याबळ नसल्याचा दावा करण्याची शक्यता आहे. तर 10 खासदारांचा पाठिंबा असल्याचीही माहिती आहे.