मुंबई : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे बंडाचे निषाण फडकवलेले आमदरात वर्षा बंगल्यावर संध्याकाळपर्यंत पोहोचणार का, याचीच उत्सुकता लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमदारांना सूचना जारी करण्यात आल्या आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हा व्हिप जारी करण्यात आला आहे. पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुले राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता तातडीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना शिवसेनेकडून करण्यात आल्या आहेत.


या बैठकीला उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदसत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल आणि परिमाणी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रेसंदर्भात असलेल्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.


शिवसेनेचे पत्र