Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारी पोहोचल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारचं भविष्य नेमकं काय असणार या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यातच राहिलं. त्यातच आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळं सत्ताधाऱ्यांची धाकधुक वाढली आहे. (Maharashtra Political Crisis Shivsena CM eknath shinde supreme court hearing postpone)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. परिणामी आज (22 ऑगस्ट) होणारी सुनावणी आता उद्या (23 ऑगस्ट) होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या आजच्या अनुपस्थितीमुळं ही सुनावणी लांबणीवर गेल्याचं सांगण्यात येत आहे. 


सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. (Eknath shinde devendra fadnavis )


शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिका पुढील सुनावणीसाठी घटनापीठाकडे सोपवणार का याचा निर्णय न्यायालयात होणार आहे. सदरील सर्व याचिकांवर सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला आहे.