...म्हणून मी मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट
Maharashtra Political News : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Prakash Ambedkar on Uddhav Thackeray : झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. 1984 मध्ये राजीग गांधींच्या सरकारमध्ये मला मंत्रीपदाची ऑफर होती. मात्र, मी मंत्रीपदाची ऑफर नाकारली. मंत्रीपदाची ऑफर का नाकारली याचा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी चक्क मंत्रिपद नाकारलं होतं.. याचा गौप्यस्फोट खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच टू द पॉईंट मुलाखतीमध्ये केलाय.. 1984 मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारमध्ये प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर होती.. मात्र त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी व्ही.पी.सिंग यांना शब्द दिला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राजीव गांधींची ऑफर नाकारली होती. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळातही मंत्रिपदाची ऑफर होती मात्र तीही नाकारली असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी या मुलाखतीत केलाय.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीये.. त्यातच प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत येऊन मंत्रिपद घेण्याची ऑफर देण्यात आलीय. भाजपसोबत 2014 पासून असलेल्या रामदास आठवले यांना मोदींच्या मंत्रिमंडळात तिस-यांदा मंत्रिपदाची संधी मिळालीये.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आठवलेंनी आता आंबेडकरांना महायुती येण्याचं आवाहन करत मंत्रिपदाची ऑफर दिलीये.. प्रकाश आंबेडकर एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही, तर आंबेडकरांनी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे, असंही आठवलेंनी म्हटलंय..
1990 मध्ये प्रकाश आंबेडकर सोबत राहिले असते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं, असा गौप्यस्फोटही रामदास आठवले यांनी केलाय.मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ चित्र दिसू शकतं, असं विधान रामदास आठवलेंनी केलंय..निवडणुकीचे पडघम सुरू झालेत, त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर दिलीये. त्यामुळे आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात, की आठवलेंच्या ऑफरकडे दुर्लक्ष करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे..