Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला (Vaidyanath Sahkari Sakhar Karkhana)  जीएसटी विभागानं नोटीस (GST Notice) पाठवली. पंकजांच्या कारखान्याला 19 कोटी रुपयांची थकबाकी नोटीस बजावण्यात आलीय. 8-9 कारखाने केंद्राकडे मदतीसाठी गेले होते. पण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा कारखाना सोडून इतरांना मदत मंजूर झाली अशी खंत पंकजांनी बोलून दाखवली आणि तिथूनच वातावरण फिरायला सुरुवात झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजांना धाडण्यात आलेल्या नोटीसमुळे मुंडे समर्थकांनी कारखान्यासाठी पैसे जमवायला सुरुवात केलीय. मुंडे समर्थक भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभे राहताना दिसतायत. कालपर्यंत ताई सक्रिय नाही म्हणणारे कार्यकर्तेही गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना वाचवण्यासाठी पंकजांच्या पाठिशी उभे राहि्याचं चित्र आहे. मुंडे समर्थक या नावाखाली सारे कार्यकर्ते गट-तट विसरुन पंकजांच्या पाठिशी उभे राहतायत..त्यात केंद्राकडून फक्त पंकजांनाच मदत नाकारण्यात आली असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेलाय आणि त्यामुळे सहानुभूती फॅक्टरचा फायदाही पंकजांना होताना दिसतोय.. अगदी एका हजारापासून 50 लाख रुपयांपर्यंतची मदत मुंडे समर्थक करतायत.


आपण आर्थिक अडमणीत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आणि मुंडे समर्थक एकवटले. मुंडे समर्थकआणि उसतोड कामगारांनी वैद्यनाथ सहकारी साखर काराखाना वाचवण्यासाठी लोकवर्गणी जमा करायला सुरुवात केली आणि बघता बघता 5 कोटी रुपये जमा झाले. हा आकजा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर मोहीम देखील राबवली जात आहे. फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपवर मदतीचे मॅसेज फिरवले जात आहेत.


शिवशक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून पंकजांनी तळागाळात पोहचण्याचा प्रयत्न केला. आता जीएसटी विभागाकडून आलेल्या नोटीसमुळे पंकजांच्या पाठिशी कार्यकर्त्यांचं बळ आणखी भक्कम होताना दिसतंय. जीएसटी विभागाने केवळ पंकजांना नोटीस धाडल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना समर्थकांमध्ये आहे. नोटीशीमुळे सहानुभूतीचा महापूर आला असून एकप्रकारे पंकजांचा जनाधार भक्कम होताना दिसतोय. त्यामुळे पंकजा पुन्हा जोरदार कमबॅक करणार असं दिसतंय. 


म्हणून पंकजांना नोटीस
पंकजा मुंडे याना धाडण्यात आलेल्या नोटीसीवरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रभर यात्रा काढली त्यामुळेचत त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. परळीतल्या पांगरी इथं वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना असून कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत. हा कारखाना गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. या कारखान्याचे साहित्य पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे.