Hiraman Khoskar Join Ajit Pawar Party : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड पहायला मिळत आहे. शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. हिरामण खोसकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा अमेक दिवसांपासून रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय... विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप हिरामण खोसकर यांच्यावर होता.. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे हिरामण खोसकर यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. हिरामण खोसकर यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती...


मात्र, आता हिरामण खोसकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह  अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय... अजित पवारांच्या निवासस्थानी हिरामण खोसकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.  नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 आमदार आहेत. यात हिरामण खोसकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.. हिरामण खोसकर हे आदिवासी बहुल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.  काँग्रेसचे आमदार असले तरी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसमोबत त्यांचे चांगले संबंध आहेत..


विधान परिषदेत खोसकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा काँग्रेसच्या नेत्यांना संशय आहे...नाशिक दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कारवाई अटळ असल्याचा इशारा दिला होता.. इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनीही काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप असलेल्यांना काँग्रेसने तिकीट न देण्याचा निर्णय घेतलाय. खोसकरांवरही क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे. त्यामुळेच उमेदवारी मिळवण्यासाठी खोसकरांनी शरद पवारांनी भेट घेतल्याची चर्चा रंगली होती.