Maharashtra Politics : कांद्यावरील निर्यात बंदी, दूधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे संसदेत या विषयांवर चर्चेची मागणी केल्याने निलंबन केल्याचा दावा शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी केला होता. त्यामुळे आता रस्त्यावरील लढाई लढण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे म्हणत अमोल कोल्हे यांनी 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चे रणशिंग फुंकले आहे. मात्र या मोर्चाबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"एका खासदाराने मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असते. एक खासदार माझ्याजवळ येऊन दीड वर्षापूर्वी माझ्याजवळ येऊन मला राजीनामा द्यायचा आहे असे सांगत होता. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळं चाललेलं आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे. मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही. अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या, असे शरद पवार म्हणाले.


"निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यामुळे पदयात्रा सुरु आहेत. कुणाला संघर्षयात्रा सुचते तर कुणाला पदयात्रा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सहा तालुक्यांमध्ये सांगतो कशी यांची भूमिका होती आणि गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपल्या मतदारसंघात पाहिलं आहे. त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्यपद्धतीने दिली होती. परंतु दोन वर्षातच तू ढेपाळला आणि तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा. एकंदरीत चित्र बघून आम्ही उमेदवारी देत असतो. आता तिथे दिलेला उमेदवार निवडणूनच आणणार आहे," असा इशारा अजित पवार यांनी दिला.


"शेतकरी अडचणीत आला तेव्हा ही आम्ही मदत केली होती. आता नव्याने आकडा येईल तेव्हा किती रक्कम इन्शुरन्सला जाईल हे बघितलं जाईल.
या देशाचे प्रतिमा उंचवणरे काम कोण करते आहे आणि आपण तीन राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे. तेलंगणामध्ये पण आपण पाहिलं की तिथले मुख्यमंत्री आधी जाहिराती देऊन सुद्धा त्यांचे सरकार गेले. मी काही ज्योतिषी नाही मी पण ज्योतिषी नाही. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान उमेदवार मोदी आहेत समोर कोणी आहे का? प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे मोदी साहेब पाहिजे का दुसरे कोणी पाहिजे. मी स्पष्ट बोलणार आहे. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान पदासाठी कोणी ही उमेदवार नाही," असेही अजित पवार म्हणाले.